Site icon e लोकहित | Marathi News

लग्न होऊन १२ वर्ष झाले तरीही मुलबाळ होत नव्हते, यांनतर बायकोसोबत नवऱ्याने केले भयानक कृत्य; ऐकून बसेल धक्का

Even after 12 years of marriage, there was no child, after which the husband did a terrible act with his wife; You will be shocked to hear

आपलं स्वतःच मूल असावं अशी प्रत्येक पती पत्नीची इच्छा असते. घराचा वंश वाढण्यासाठी मूल हे गरजेचंच असत. मात्र महिलांना काही अडचणींमुळे लवकर मुले होत नाहीत. यावेळी त्यांना पतीची साथ असणे खूप गरजेचे असते. समाजाने काहीही म्हंटल तरी जर पती सोबत असेल तर एक स्त्री खंबीरपणे आयुष्य जगू शकते. मात्र पती साथ देत नसेल तर स्त्री खचून जाते. अनेकदा महिलांना मुलं न झाल्याने त्यांना जाच केल्याच्या घटना घडत असतात.

“मरने का किसको ख़ौफ़ यहाँ”, विनेश फोगाटची ‘ती’ पोस्ट चर्चेत

मुलं न झाल्याने महिलांना सासू सासऱ्यांकडून किंवा पतीकडून जाच होत असतो. सध्या देखील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाला 12 वर्ष होऊनही मूलबाळ होत नसल्यानं पतीनं पत्नीची डोक्यात वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नवरा लपून-छपून पाहत होता सुंदर मुलींचे फोटो, बायकोला माहित होताच तिने केलं असं की…, पाहून तुम्हीही व्हाल थक्क

अंबरनाथच्या (Ambernath Murder) ऑर्डनन्स इस्टेटमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने तेथील परिसरात खळबळ उडाली आहे. रोनीतराज मंडल असं या आरोपीचं नाव आहे. हत्या केल्यानंतर त्याने बनाव रचला. पोलिसांच्या तपासात मात्र त्याचा बनाव उघडा पडला आणि पोलिसांनी त्याला लगेच अटक केली आहे.

मोठी बातमी! ‘या’ दिवशी लागणार 10वीचा निकाल

रोनीतराज मंडल नेहमीच बायकोच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण करत असे. मात्र, रविवारी दुपारी रोनीतराज याने मद्यपान केल्यानंतर त्या दोघांमध्ये भांडण झाले. यावेळी पतीने रागात पत्नीच्या डोक्यात अवजड वस्तू मारून तिची हत्या केली. त्यानंतर आपल्याला काहीच माहिती नसल्याचा बनाव देखील रचला. मात्र या घटनेबाबत पोलिसांनी सखोल चौकशी केली आणि पोलिसांच्या लक्षात आले की हाच आरोपी आहे. आणि पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली.

ब्रेकिंग! समृद्धी महामार्गावर रेलिंगला धडकून कारला भीषण आग; २ जणांचा होरपळून मृत्यू

Spread the love
Exit mobile version