Chandrayaan 3। चंद्राजवळ पोहोचूनही ‘चांद्रयान 3’ला 23 तारखेपूर्वी लँडिंग शक्य नाही, कारण…

Even after reaching the moon, 'Chandrayaan 3' cannot land before 23rd, because…

Chandrayaan 3 । इस्रोने आपल्या महत्त्वाकांक्षी चंद्रयान मोहिमेअंतर्गत 14 जुलैला चंद्रयान-3 चं (Chandrayaan 3) यशस्वी प्रक्षेपण केलेले आहे. चांद्रयान-३ आता चंद्राच्या जवळ (Moon Mission) पोहोचले आहे. ‘चंद्रयान-3’ पाठवण्यासाठी एलव्हीएम-3 लाँचरचा (LVM-3 Launcher) वापर केला असून जर लँडर सॉफ्ट दक्षिण ध्रुवावर गेला तर भारत हा दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश बनू शकतो. (Latest Marathi News)

बंपर ऑफर! स्वस्तात खरेदी करा iPhone 12, ‘या’ ठिकाणी मिळत आहे संधी

परंतु आता हा विक्रम रशियाच्या (Russia) नावावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण रशियाचं ‘लूना 25’ (Luna 25) हे शक्तिशाली रॉकेट अल्पावधीत चंद्रापर्यंत पोहोचलं आहे. हे रॉकेट वर्षभर चंद्रावर असणार आहे. चंद्रावरील पाण्याचे अस्तित्व तपासण्यासाठी लूना चंद्राच्या पृष्ठभागाचे 6 इंच खोलपर्यंत नमूने जमा करेल. दरम्यान, चांद्रयान 3 हे रशियाच्या अगोदर चंद्राजवळ पोहोचले असले तरी त्याचे 23 तारखेपूर्वी लँडिंग (Chandrayaan 3 Landing) शक्य नाही.

lumpy skin disease : पशुपालकांनो सावधान! लम्पी विषाणूचा शेळ्यांवर होतोय परिणाम, जाणून घ्या कशी घ्यावी काळजी?

कारण चंद्रावर रात्री वातावरण खूप थंड असते. त्यामुळे या तापमानात कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रिक उपकरणे काम करत नाहीत. त्यामुळे 23 तारखेला चंद्रावर दिवस उजाडण्यापूर्वी लँड करणे चांद्रयानाला शक्य होणार नाही. समजा हे लँडिंग शक्य झाले नाही, तर 24 ऑगस्टला पुन्हा प्रयत्न केला जाणार आहे. जर पुन्हा हा प्रयत्न अयशस्वी झाला तर पुन्हा प्रयत्न केला जाईल.

पुणे लोकसभा जागा वाटपावरून ठाकरे-पवारांमध्ये मतभेद, ठाकरे गटाने केली ‘ही’ मागणी

Spread the love