काही वर्षांपूर्वी लग्नात हुंड्याची प्रथा (Dowry tradition) होती. यामध्ये मुलीचे आईवडील मुलाला ठराविक रक्कम किंवा वस्तू द्यायचे. दरम्यान हळूहळू साक्षरता (Litracy) वाढली. समाजात वैचारिक क्रांती झाली आणि ही प्रथा बंद झाली. मात्र आजही देशातील काही भागात हुंड्याची प्रथा सुरू आहे. उत्तरप्रदेश मध्ये एक हुंडाबळी संबंधित घटना समोर आली आहे. दहा लाखांचा हुंडा दिल्याशिवाय पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवणार नाही. अशी धक्कादायक अट एका नवविवाहित पुरुषाने ठेवली आहे. ( Husband refused for physical relationship due to dowry)
धक्कादायक! बारामतीमध्ये ३८ लाखांचे प्रतिबंधीत पदार्थ जप्त; पोलिसांनी केली मोठी कारवाई
उत्तर प्रदेश मधील तिलीभत येथे तीन महिन्यांपूर्वी म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात एक विवाह झाला होता. यावेळी दोन्ही कुटुंबामध्ये १० लाखांच्या हुंड्याची बोली झाली होती. मात्र पीडितेच्या घरच्यांना एवढे पैसे देणे शक्य झाले नाही. यामुळे तिच्या पतीने लग्नाला तीन महिने उलटून सुद्धा शारीरिक संबंध ठेवले नाहीत. एवढंच नाही तर लग्नानंतर हे दोघे पती-पत्नी हनिमून साठी नैनितालला गेले होते. मात्र येथे सुद्धा पती नववधूपासून लांब राहिला. याठिकाणी त्याने वधूचे काही अश्लील फोटो देखील काढले.
हे फोटो दाखवून त्याने नववधूला ब्लॅकमेल करत हुंड्याच्या पैशांची मागणी केली. यावेळी पीडितेने आपल्या सासूला सर्व प्रकरणाची माहिती दिली. मात्र सासूने देखील हुंड्यासाठी तिचा छळ केला. नंतर पीडितेने आपल्या जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जात याप्रकरणी तक्रार केली आहे.
Samsung ची धमाकेदार ऑफर १ लाख रुपयांचा फोन फक्त २२ हजारांना, पाहा भन्नाट ऑफर