दसऱ्यापूर्वीच झेंडूचा भाव 70 रुपये किलोपर्यंत; आणखी भाव वाढण्याची शक्यता

Even before Dussehra, marigold price up to Rs 70 per kg; Chances of further price increase

गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान फुलांना देखील बाजार नसल्याने शेतकरी चिंतेत होते.परंतु आता मात्र शेतकऱ्यांच्या झेंडूला चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहे. आता आजपासून नवरात्री उत्सव सुरु होत आहे. नवरात्री 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2022 या कालावधीत आहे. त्यामुळे फुलांना मोठी मागणी असते. त्याचबरोबर झेंडूच्या फुलाला 50 ते 70 रुपये प्रतिकिलो भाव शेतकऱ्यांना मिळत आहे.

आता लसणाच्या दरात मोठी घट होण्याची शक्यता; वाचा आजचे दर

दरम्यान अशातच नंदुरबार आणि नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची शेतं फुलांनी बहरली आहेत. ज्याचा त्यांना फायदा होताना दिसत आहे. महत्वाचं म्हणजे ही रंगीबेरंगी फुले अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. नवरात्रीचे 9 दिवस देवीच्या 9 वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. यामुळे फुलांना मोठी मागणी असल्याने शेतकरी दरवर्षी फुलशेतीचे नियोजन करतात. तसेच आता दिवाळी देखील येत आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत हे दर असेच रहावेत अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत.

Devendra Fadnavis: “फडणवीस फक्त 6 नाही 12 जिल्हे सांभाळू शकतात” , रामदास आठवलेंनी फडणवीसांचे केले कौतुक

तसेच मुंबईच्या दादर फूल मंडई आणि वाशीमध्येही याच फुलांची संख्या वाढताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांतून येथे फुले येतात. दरम्यान फूल मंडई गुलाबाचा तुकडा 20 रुपये तर मोगरा फुलाला 1000 रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळत आहे. तर पुण्यात गुलाबाचा तुकडा ४० रुपयांना विकला जात आहे.

तिरूपती बालाजीची संपत्ती जाहीर, आकडेवारी पाहून व्हाल चकित! वाचा सविस्तर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *