Site icon e लोकहित | Marathi News

फायनलआधीच चेन्नईच्या ‘या’ बड्या खेळाडूचं धक्कादायक वक्तव्य; म्हणाला, “मला समोर मुंबईची टीम नकोय”

Even before the final, the shocking statement of 'this' big player of Chennai; Said, "I don't want a Mumbai team in front of me."

IPl ची फायनल मॅच लवकरच खेळली जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दुसरा फायनलिस्ट होण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यांत उद्या भिडंत होणार आहे. दरम्यानCSK चा माजी बॉलर ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo) याने एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. “फायनल मॅचमध्ये मुंबईचा सामना करण्याची आमची इच्छा अजिबात नाही, असं ड्वेन ब्रावो म्हणाला आहे.

Murder | प्रेयसीच्या छातीत, पोटात चाकूने वार केले… शरीराचे तुकडे केले आणि त्यानंतर केलेले कृत्य वाचून तुमच्याही अंगावर येईल काटा!

IPL २०२३ ची फायनल मॅच २८ मे रोजी अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi stadium) खेळली जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्सने फायनलचा टप्पा गाठला आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) ने लखनऊ सुपर जेन्ट्स (Lucknow Super Giants) ला हरवून क्वालिफायर- २ मध्ये प्रवेश केला आहे. गुजरात विरुद्धच्या मॅच मध्ये जर, मुंबईने विजय मिळवला तर ते थेट फायनल मध्ये चेन्नई सुपर किंग्सला भिडणार आहेत. फायनलमध्ये मुंबई बरोबर सामना करण्याची आमची इच्छा नाही, असं चेन्नईच्या माजी क्रिकेटपट्टूने म्हटलं आहे.

मेंढ्या घेऊन जाणाऱ्या मालमोटारीचा भीषण अपघात, पाच लोकांसह १९० मेंढ्यांचा जागीच मृत्यू

चेन्नई सुपर किंग्स कडून ड्वेन ब्रावो बरीच वर्ष खेळला आहे. फायनलमध्ये आमची मुंबई इंडियन्स बरोबर मॅच व्हावी अशी माझी अजिबात इच्छा नाही असं ब्रावोचं म्हणणं आहे. “माझ्या मित्राला म्हणजे कायरन पोलार्डला (Kieron Pollard) देखील याबाबत माहिती आहे. माझ्याकडून सर्व टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. फायनलमध्ये कोण प्रवेश करणार? याकडे आमची नजर आहे.” सोशल मीडियावर ब्राव्होचा हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे.

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलताना वयोवृद्ध आजोबा जमिनीवर कोसळले अन् त्यानंतर…

चेन्नईची टीम आजवर ४ वेळा आयपीएल ट्रॉफीची दावेदार ठरली आहे. मुंबई आणि चेन्नई आत्तापर्यंत ४ वेळा फायनलमध्ये आमने-सामने खेळल्या आहेत. त्यामध्ये मुंबई इंडियन्स ३ वेळा तर चेन्नई एकदा जिंकली आहे. चेन्नई ने मुंबईला २०१० मध्ये हरवून ट्रॉफी जिंकली होती. तर मुंबईने २०१३, २०१५, २०१९ या वर्षांमध्ये चेन्नईला हरवून ट्रॉफी जिंकली होती.

मान्सून संदर्भात समोर आली सर्वात मोठी अपडेट! हवामान विभागाने दिली महत्वाची माहिती

Spread the love
Exit mobile version