शिंदे व ठाकरे गटातील सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच लागणार आहे. दरम्यान हा निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे गटाचे १६ आमदार अपात्र झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागणार आहे. यामुळे शिंदे-फडणवीस सरकार लवकरच कोसळणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार ( Ajit Pawar) यांना मात्र शिंदे-फडणवीस सरकार टिकेल असे वाटत आहे.
राज कुंद्राचा अतरंगी अवतार पाहून नेटकरी म्हणाले, “याने तर उर्फीलाही…”
ठाकरे गटाचे १६ आमदार अपात्र झाले तरी एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील. शिंदे-फडणवीस सरकार ( Shinde- Fadanvis Government) कोसळणार नाही. असा दावा अजित पवारांनी केला आहे. दरम्यान हे सरकार कसे टिकेल याचे गणित अजित पवारांनी समजावून सांगितले आहे.
राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता फुटणार? भाजपकडून आली ऑफर! थेट मोदींनीच केले कौतुक
अजित पवार यांच्या म्हणण्यानुसार, सध्या भाजपकडे अपक्ष धरून ११५ आमदार आहेत. त्यात भाजपचे एकूण १०६ आमदार इतर अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडे एकूण ४० आमदार आहेत. शिंदेंचे १० अपक्ष सत्ता असतील तिकडे जाणार त्यामुळे त्यांना बाजूला ठेवले तर शिंदेंकडे फक्त ४० आमदार उरतात. शिंदे गट आणि भाजपचे आमदार मिळून आमदारांची संख्या १५० च्या पुढे जाते. दरम्यान भाजप व शिंदे गटाच्या युतीसोबत १० अपक्ष आमदारांचा पाठिंबा येईल.
अजित पवारांचा निर्णय पक्का? तिथी लवकरच काढली जाईल; गुलाबराव पाटील यांचे सूचक वक्तव्य
या आमदारांची एकूण गोळाबेरीज केली तर, एकूण १६५ आमदार होतात. यातील १६ आमदार अपात्र होऊन कमी झालेच तर युतीकडे १४९ आमदार उरतात. महत्त्वाची बाब म्हणजे बहुमताचा आकडा १४५ आहे. या गणितानुसार विधानसभेची सदस्यसंख्या विचारात घेता, शिंदे-फडणवीस गटाचे बहुमत सिद्ध होते. यामुळे शिंदे- फडणवीस सरकार कोसळणार नाही. असे अजित पवार म्हणाले आहेत. तसेच त्यांनी गरज नसताना नको ती चित्रे रंगवू नका असे ठणकावून सांगितले आहे.
अमोल मिटकरींच्या ट्विटने राजकीय वर्तुळात उडाली खळबळ; ट्विट करत म्हणाले, “भाजपाकडून…”