Site icon e लोकहित | Marathi News

Bacchu Kadu : “आमचे ४० आमदार परत गेले तरी राज्य सरकारला धोका नाही”, बच्चू कडूंचे विधान चर्चेत

मुंबई : राज्यात सध्या शिंदे आणि फडवणीस सरकार आहे. या सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार अजून बाकी आहे. त्यातच बच्चू कडू यांनी 40आमदार गेले तरी राज्य सरकारला धोका नाही. भाजपा आणि अपक्ष आमदार मिळवून सरकार स्थापन करू शकतो. असे धक्कादायक विधान आमदार बच्चू कडू यांनी केले. मंत्रिमंडळ विस्तारासाठी आम्हाला कुणाचीही भीती नाही हा अंतर्गत प्रश्न आहे. असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना बच्चू कडू यांनी लगावला. सरकार कोसळण्याच्या भीतीने मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला आहे अशी टीका शिंदे सरकारवर नाना पटोले यांनी केली होती.

दोन मंत्री चालवत असलेले सरकार अपंग आहे, राज्य सरकार अपंग आहे अशी टीका नाना पाटोळे यांनी राज्य सरकारवर केली. दिव्यांगांना कमजोर समजणे हा नाना पटोले यांचा गैरसमज आहे. ते लोक तुमच्यापेक्षाही सक्षम आहे असा टोला बच्चू कडू यांनी पटोले यांना लगावला. नाना पटोले यांनी आपले शब्द मागे घ्यावेत अशी मागणी केली.

राज्याचा कारभार सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांभाळण्यासाठी सक्षम आहे. काही अडचणीमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला आहे परंतु यामुळे शेतकऱ्याचे कोणतेही नुकसान झाले नाही. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध योजना आखल्या आहेत. “जर शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळाली नाही तर आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू असं वचन बच्चू कडू आणि शेतकऱ्यांना दिले आहे.”

Spread the love
Exit mobile version