दिल्ली : मागच्या बऱ्याच दिवसापासून पंकजा मुंडे नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आता पंकजा मुंडेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन दिले आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त बीडच्या अंबाजोगाई या ठिकाणी सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील “बुद्धिजीवी लोकांसोबत संवाद” या कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनी हजेरी लावली होती. यावेळी या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे गंभीर वक्तव्य केलं आहे. सध्या त्यांचे वक्तव्य खूप चर्चेत आहे.
पीएफआय विरोधात केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय; पुढच्या पाच वर्षांसाठी…
काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
पंकजा मुंडे म्हणाल्या की, काँग्रेस पक्षात वंशवादाचे राजकारण चालू असून मोदींना तेच संपवायचे असून. त्याचा अर्थ असा नाही की, म्हणत पंकजा मुंडे यांनी एक क्षण विचार केला आणि यामध्ये मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. पण मला कोणीही संपवू शकतं नाही. मोदी सुद्धा मला संपवू शकत नाहीत. जर मी तुम्हा सर्वांच्या मनावर राज्य केले तर, असे विधान मुंडेंनी केल आहे. सध्या या विधानाच्या जोरदार चर्चा चालू आहेत.
Ambadas Danave: शिंदे गटाचा जल्लोष तात्पुरत्या स्वरूपाचा – अंबादास दानवे
त्याचबरोबर पुढे त्या म्हणाल्या की, “आपल्याला राजकारणात स्वछता करायची आहे त्यामुळे राजकारणात बदल करावे लागतील. सध्या राजकारण हे एक करमणुकीचं साधन होत चाललं आहे. गणेशमंडळ करा, नाटक बोलवा, तमाशा बोलवा, नवरात्री, दांडीया करा, गरबा करा, नेमकं चाललंय तरी काय हे ? हे आमचं काम नाही”.
Cotton: यंदा कापसाला उच्चांकी बाजारभाव मिळणार का? जाणून घ्या आंतरराष्ट्रीय बाजारभाव