मुंबई: सरकारविरोधात महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi ) महामोर्चा काढणार असल्याचं घोषित केलं आहे. याबाबत काल महाविकास आघाडीची बैठक पार पडली. व यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषद देखील घेतली. यामुळे आता सरकारविरोधात महाविकास आघाडीने महामोर्चा काढणार आहे.
“येत्या ४८ तासांत हे प्रकरण संपलं नाही तर…”, शरद पवारांचा कर्नाटक सरकारला गंभीर इशारा
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राज्यपालांना हटवण्याची मागणी महाविकासआघाडीने केली आहे. पण त्याआधी जरी राज्यपालांना हटवलं गेलं तरी मोर्चा हा निघणारच असं अजित पवार म्हंटले आहेत.
ग्रामीण भागात पुन्हा एकदा PMPL धावणार – आमदार राहुल दादा कुल
त्याचबरोबर अजित पवार पुढे म्हणाले, “8 तारखेला सर्वपक्षीय बैठक होणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी या मोर्चाला पाठिंबा द्यावा, शिंदे-फडणवीस सरकार हे आपयशी राहिले आहेत. अनेक उद्योग महाराष्ट्रामधून बाहेर जात आहेत आणि जे आहेत ते देखील घालवत आहेत” असं देखील अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.
कर्नाटक वादावर शरद पवार यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…