Site icon e लोकहित | Marathi News

“मी गॅंगस्टर होईल असा स्वप्नातही विचार…”, लॉरेन्स बिश्नोईने केला मोठा खुलासा

“Even in my dreams I thought I would become a gangster…”, reveals Lawrence Bishnoi

मनोरंजन क्षेत्रातील प्रसिध्द व्यक्तींभोवती धमक्यांचे सावट सतत घोंघावत असते. प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येमधील प्रमुख आरोपी लॉरेन्स बिश्नोई ( Lorence Bishnoi) याने मध्यंतरी सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. यामुळे मनोरंजन क्षेत्रात गोंधळ उडाला होता. दरम्यान नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला दिलेल्या धमकीमागचे कारण स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने अनेक वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासे केले आहेत.

ऊसतोड मजुरांकडून शेतकऱ्यांची लूट सुरूच! ऊस तोडण्यासाठी करतायेत एकरी 5 ते 7 हजार रुपयांची मागणी

लॉरेन्स बिश्नोई याला गँगस्टर म्हणून सगळीकडे ओळखले जाते. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “मी गॅंगस्टर होईल, असा स्वप्नातही विचार केला नव्हता. मला माझ्या परिस्थितीने गुंड बनवलं आहे. महाविद्यालयीन जीवनात झालेल्या काही भांडणानंतर मला आणि माझ्या काही सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून मी तुरुंगातच आहे. मला या तुरुंगानेच गॅंगस्टर बनवलं असल्याचं यावेळी लॉरेन्स बिश्नोई म्हणाला आहे.

‘या’ ठिकणी अवघ्या 60 रुपयांत मिळते अनलिमिटेड जेवण; मात्र नासाडी केल्यास भरावा लागतो ‘एवढा’ दंड

त्याचबरोबर पुढे तो म्हणाला, “ काही गुंडानी तुरुंगामध्ये माझ्या सहकाऱ्यांची हत्या केली. माझ्या सहकाऱ्यांची हत्या होऊन देखील याबाबत पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे आम्हाला शस्र उचलावी लागली. सहकाऱ्यांचा बदला घेण्यासाठी चुकीच्या मार्गावर जावं लागलं. असे देखील यावेळी तो म्हणाला आहे.

हनी सिंगने फक्त गाडीच्या नंबरसाठी खर्च केले होते ‘इतके’ लाख रुपये; आकडा वाचून व्हाल थक्क

सिद्धू मुसेवाला याची हत्या देखील आम्ही आमच्या सहकाऱ्यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी केली. कारण सिद्धू मुसेवाला याने आमच्या सहकाऱ्यांना मारणाऱ्यांना मदत केली होती”, याबाबत देखील त्याने यावेळी खुलासा केला आहे.

बिग ब्रेकिंग! अहमदनगरमध्ये H3N2 चा पहिला रुग्ण दगावला, महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं

Spread the love
Exit mobile version