अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ तर त्यांच्यासोबत इतर ८ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) अजित पवार आणि शरद पवार (Sharad Pawar) असे दोन गट पडले आहे. काही जण अजित पवार गटाला तर काही जण शरद पवार गटाला समर्थन देत आहेत. अशीच काहीशी घटना समोर आली आहे. (Latest Marathi News)
शरद पवार यांना पाठिंबा देत एका शेतकऱ्याने चक्क बैलाच्या अंगावर ‘आम्ही साहेबांच्या सोबत’ असे लिहिले आहे. त्याच्या या कलाकृतीची आता सर्वत्र चर्चा होत आहे. बेंदूर सणाच्या निमित्ताने सांगलीतील (Sangli) वाळवा तालुक्यातील तांबवेमधील शेतकऱ्याने ही कलाकारी केली आहे. आनंदराव गावडे यांनी त्यांच्या कॅप्टन आणि पल्सर या बैलांच्या अंगावर ही कलाकृती केली असून एका बाजूला विठ्ठल आणि दुसऱ्या बाजूला शरद पवार यांचा फोटो रेखाटला आहे.
राष्ट्रवादीचे चिन्ह कोणाला मिळणार, साहेब की दादा? शिंदे गटाच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
दरम्यान, अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि चिन्हावर दावा केला आहे. हे प्रकरण आता निवडणूक आयोगाकडे (Election Commission) गेले आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. परंतु याचा फटका दोन्ही गटाला आगामी निवडणुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो.