![Even though one of his legs is missing, the sixth-grader climbed Raigad Fort!](http://elokhit.com/wp-content/uploads/2023/01/omkar.jpg)
जर आपल्याला एखादी गोष्ट करण्याची जिद्द असेल तर आपण काहीही करू शकतो असे म्हंटले जाते. आता याच जिद्दीच्या जोरावर. पिंपरी चिंचवडमधील ओमकार लकडे या सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने अपघातात एक पाय गमावलेला असताना देखील रायगड किल्ला सर केला आहे. सध्या याची सगळीकडे चर्चा सुरु आहे. राज्यभरातून या चिमुकल्याचा कौतुक होत आहे.
शाहरुख खानचा बहुचर्चित पठाण चित्रपट अखेर आज रिलीज!
ओमकारने एका अपघातामध्ये त्याचा एक पाय गमावला आहे. यामुळे ओंकार रायगड किल्ला सर करेल का? असा प्रश्न शिक्षकांच्या मनात होता. मात्र बाकी विद्यार्थ्यांसोबतच सव्वा दोन तासामध्ये रायगड किल्ला सर केला आहे. त्यामुळे त्याचे सगळीकडे कौतुक केले जात आहे.
मेडिकलला आग लागून आगीत लाखो रुपयांची औषधं जळून खाक!
दरम्यान, ओमकार हा पिंपरी चिंचवडमधीलविद्यानिकेतन शाळेत शिकत आहे. २० जानेवारी रोजी शाळेची सहल रायगडावर गेली होती. यावेळी ओंकारला देखील सहलीला जायचे होते. त्याची ही इच्छा पाहून त्याच्या पालकांनी देखील त्याला संमती दिली.
गाडीवर स्टंट करत तरुणीला केले प्रपोज; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
रायगडावर शिक्षकांनी त्याला रोपवेने घेऊन जाऊ असे म्हटले मात्र त्याला इतर विद्यार्थ्यांसोबत पायऱ्याने किल्ला चढायचा होता. यामुळे ओंकार रायगड किल्ला सर करेल का? असा प्रश्न शिक्षकांच्या मनात होता. मात्र बाकी विद्यार्थ्यांसोबतच सव्वा दोन तासामध्ये रायगड किल्ला सर केला आहे. त्यामुळे त्याचे सगळीकडे कौतुक केले जात आहे.
‘या’ नेत्याने घेतला सुप्रिया सुळेंच्या भोळेपणाचा फायदा! खोटे बोलून केली फसवणूक