
Sharad Pawar । एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मागील वर्षी शिवसेनेमध्ये बंड केले त्यानंतर यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केले. त्यानंतर त्यांनी आपल्याकडे जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गोटात दाखल झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Latest Marathi News)
हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये पुन्हा ढगफुटी! मुसळधार पावसामुळे 90 जणांचा मृत्यू
परंतु शरद पवारांचा एक साथीदार आहे ज्याने अजूनही त्यांची साथ सोडली नाही. गामा असे त्या व्यक्तीचे नाव असून ते मागील ५० वर्षांपासून शरद पवारांच्या गाडीचे चालक आहेत. पक्ष फुटीनंतर शरद पवारांनी महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे आणि यावेळी ते त्यांचे चालक आहेत. ते फक्त त्यांचे चालकच नाही तर त्यांची काळजीही घेतात. ’लोक माझे सांगाती’ या पवारांच्या आत्मकथेत त्यांनी गामा यांचा थोडक्यात उल्लेख केला आहे.
गामा हे बारामतीतील (Baramati) दिवंगत डॉक्टर एम.आर. शहा यांच्या गाडीचे ड्रायव्हर होते, त्यांनीच हा त्यांचा ड्रायव्हर शरद पवारांना दिला. ‘लोक माझे सांगाती’ या आत्मकथेत शरद पवार यांनी असेल म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या (Maharashtra) कुठल्याही प्रवासात गामा शरद पवार यांच्या पालकत्वाचे कर्तव्य देखील पार पडताना दिसतो. दौऱ्यादरम्यान पवारांचे प्रवासातील कपडे, औषध यासारख्या सर्व गोष्टींची जबाबदारी गामाकडे असते.
अपघाताचे सत्र थांबेना! नाशिकमध्ये भाविकांची बस कोसळली दरीत, समृद्धी महामार्गावरही आणखी भीषण अपघात
प्रवासावेळी शरद पवार हे गामा यांच्यासोबत महत्त्वाच्या व्यक्तींसोबत महत्त्वाच्या विषयांवर बोलतात. परंतु त्याची वाच्यता गामा कधीच करत नाही. ५० वर्षांपासून ते आतापर्यंत गामा पवारांच्या वाहनाचे सारथ्य करत असून त्यांचे नाव विश्वासू व्यक्तींमध्ये घेतले जाते.