
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार ( Sharad Pawar) यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक जबरदस्त टोला लागवला आहे. मोदी यांच्या ‘त्या’ एका वाक्यामुळे आपण संसदेत जायला घाबरतो. असे शरद पवार यावेळी म्हणाले आहेत. विशेष म्हणजे ते वाक्य ऐकून कार्यक्रमात उपस्थित लोक देखील हसू लागले. पिंपरी येथील जागतिक मराठी दिनाच्या कार्यक्रमात शरद पवार उपस्थित होते. यावेळी त्यांनी हे विधान केले आहे.
मांढरदेव यात्रा कालावधीत प्रतिबंध आदेश; पशुहत्या होऊ नये यासाठी प्रशासन तत्पर
या कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे ( Sushilkumar Shinde) व इतर मान्यवर उपस्थित होते. दरम्यान सुशीलकुमार शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी “मी शरद पवारांच्या तालमीत तयार झालो” असे विधान केले. या विधानाचा वापर करून शरद पवारांनी त्यांच्या स्टाईलमध्ये नरेंद्र मोदी यांना जबरदस्त टोला लागवला.
ब्रेकिंग! सोनिया गांधी यांची प्रकृती खालावली; राहुल गांधी भेट घेण्यासाठी दिल्लीला पोहोचले
आपले मनोगत व्यक्त करत असताना शरद पवार म्हणाले की, ” आता बोलताना सुशीलकुमार शिंदेंनी सांगितले की, ते शरद पवारांच्या तालमीत तयार झाले आहेत. परंतु, कोणी असे बोलले की मला भीती वाटते. कारण याआधी कोणीतरी म्हंटल होत की, मी शरद पवारांच बोट धरून राजकारणात आलोय. दिल्लीच्या संसदेत जायला मी तेव्हापासून घाबरतो.” असे शरद पवार म्हणाले.
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगचा राडा; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना झाली कैद