
मुंबई : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकार बेरोजगारी आणि महागाईला घाबरत आहे तसेच जनतेच्या ताकतीला देखील घाबरत आहेत. सत्तेतील लोक खोटं बोलत आहेत. देशात बेरोजगारी, महागाई नाही, देशात चीनची घुसखोरी झालेली नाही, असं हे लोक खोटं सांगत आहेत. हे लोक खोटं बोलतात. केवळ खोटे बोलतात, असा जोरदार आरोप राहुल गांधींनी केलेला आहे.
सर्वाधिक बेरोजगारी देशात आहे. पेट्रोल- डिझेल (Petrol-Diesel) आणि गॅसचे दर वाढत असून अर्थमंत्र्यांचं त्याकडे लक्ष नाही. कोणत्याही गावात जा, शहरात जा, लोकच तुम्हाला सांगतील महागाई आहे म्हणून. लोकांना महागाई दिसते. पण सरकारला दिसत नाही, असा जोरदार हल्लाबोल देखील त्यांनी केला आहे.
याचसोबत हिटलर सुद्धा निवडणुकीत जिंकून आला होता. तोही निवडणुका जिंकायचा. हिटलर जवळ जर्मनीच्या सर्व संस्थांचा ढाचा होता. तसेच भारतातील प्रत्येक संस्था आणि यंत्रणा आज स्वतंत्र तसेच निष्पक्ष नाहीत. भारतातील प्रत्येक यंत्रणा आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ताब्यात आहे. प्रत्येक संस्थेत संघाचा माणूस आहे. त्यामुळे आपण केवळ एखाद्या राजकीय पक्षाच्या विरोधात लढत नाही. तर भारताच्या संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरच्या विरोधात लढत आहोत, अस वक्तव्य राहुल गांधी यांनी केलेले आहे.
दरम्यान, आज राष्ट्रपती भवनावर राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आलेला आहे. हा मोर्चा राष्ट्रपती भवनाकडे जात असताना अडवण्यात आल्यावर काँग्रेस कार्यकर्ते अधिकच आक्रमक झालेले. यानंतर पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासोबत 64 खासदार आणि अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे.