सगळं ठरलंय! लोकसभा 2024 च्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सज्ज

Everything is decided! Mahavikas Aghadi ready for Lok Sabha 2024 elections

अगामी लोकसभा निवडणूक 2024 ( Loksabha Election 2024) साठी सर्व पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान राष्ट्रवादी, ठाकरे गट व काँग्रेस या लोकसभेत एकत्र निवडणूक लढवणार आहे. यासाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला देखील ठरला असून लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी ठाकरे गट 21 जागा, राष्ट्रवादी 19 जागा व काँग्रेस 8 जागा लढवणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईमधल्या सहा लोकसभेच्या जागांपैकी चार जागा ठाकरे गट लढवणार असून उर्वरित दोन जागा राष्ट्रवादी व काँग्रेसकडे असणार आहेत.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता ‘या’ तारखेला होणार जमा

लोकसभा निवडणुक 2024 च्या एकूण 48 जागांपैकी फक्त 5 ते 6 जागांवर महाविकास आघाडीची ( MVA ) पूर्ण सहमती झालेली नाही. मात्र बाकी जागांवर महाविकास आघाडीचा प्लॅन ठरला असून त्यानुसार मोर्चेबांधणीला सुरुवात देखील झाली आहे. तसेच भाजपने सुद्धा यावेळी आपल्या रणनीतीमध्ये मोठा बदल केला आहे. देशात सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यासाठी भाजपने पुन्हा एकदा कंबर कसली आहे.

सोलापूरची ‘ही’ प्रसिद्ध भेळ तुम्ही खाल्लीय का? ‘या’ स्वस्तात मस्त चवदार व पोटभर भेळीचा एकदा आस्वाद घ्याच!

या पार्श्वभूमीवर मोदींची ( Narendra Modi) प्रत्येक योजना सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचवा अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. महाविकास आघाडीच्या बालेकिल्ल्यांवर देखील भाजप यावेळी चांगलेच लक्ष ठेऊन आहे. ही निवडणूक भाजप व शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची ठरणार असून आता राजकीय वर्तुळात आणखी कोणती चक्रे फिरणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मोठी बातमी! उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना 1 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न; पाहा नेमकं काय आहे प्रकरण?

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *