मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक (Maharashtra-Karnataka) सीमावाद चालू आहे. मात्र आता हा वाद आणखी चिघळला आहे. बेळगावजवळ हिरेबागवाडी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली आहे.
जनावरांना मिळणार अवघ्या 300 रुपयांत विमा; वाचा सविस्तर माहिती
या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत स्वत:ला लाठीहल्ल्याला तोंड द्यावे लागले असे म्हंटले आहे. यावर निलेश राणे यांनी ट्विट करत शरद पवार निशाणा साधला आहे.
निलेश राणे यांनी ट्विट करत लिहिले की, “पवार साहेबांनी महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर प्रकरणात 1986 ला पोलिसांकडून मार खाल्ला याचा कोणीतरी पुरावा मला पाठवा….. मिळत नाहीये”. सध्या हे ट्विट खूप चर्चेत आहे. आता या ट्विटवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत.
पवार साहेबांनी महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर प्रकरणात 1986 ला पोलिसांकडून मार खाल्ला याचा कोणीतरी पुरावा मला पाठवा.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 6, 2022
मिळत नाहीये.
“शरद पवारांना बेळगावाला जायची गरज पडणार नाही” – देवेंद्र फडणवीस
दरम्यान, काल कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक केली आहे. यामुळे तेथील टोलनाक्यावर वातावरण चिघळलं. कन्नड रक्षण वेदिकेचे नेते नारायण गौडा आहेत. त्यांना पोलिसांनी हा दौरा करण्यास मनाई केली होती तरी देखील ते बेळगावच्या दिशेने आले. त्यामुळे हिरेबागवाडी येथील टोलनाक्यावर पोलिसांनी त्यांना रोखलं. यावेळी संतापलेल्या कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक केली.
“…अन्यथा मला कर्नाटकात यावे लागेल”, संभाजीराजे छत्रपतींचा गंभीर इशारा