सैराट, फँड्री, नाळ आणि झुंडच्या यशानंतर प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व लेखक नागराज मंजुळे यांचा घर बंदूक बिर्याणी हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात आकाश ठोसर, सयाजी शिंदे, सायली पाटील हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. येत्या 7 एप्रिलला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
Gold Rate: ऐन लग्नसराईत सोन्याचे भाव वाढले
या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नागराज मंजुळे, आकाश ठोसर, सयाजी शिंदे, सायली पाटील हे महाराष्ट्र्भर दौरा करत आहे. तसेच अनेक ठिकाणी मुलखती देखील देत आहेत. नुकतीच आकाश ठोसर व सायली पाटीलने ‘चिंगारी अॅप’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यामध्ये दोघांनीही विविध मुद्द्यावर भाष्य केलं आहे. यावेळी आकाशला काही गमतीशीर प्रश्न विचारण्यात आले. आणि यावर आकाशने देखील मजेशीर उत्तरे दिली आहेत.
बिग ब्रेकिंग! सोनिया गांधी कॅम्पला भीषण आग
यावेळी आकाशला विचारण्यात आले “एक्सला टोमणे मारायचे म्हणून पोस्ट टाकली आहे का?” यावर उत्तर देत आकाश म्हणाला, “अजिबात नाही. एक्स अशीच बघून जळत असेल. त्यासाठी मला पोस्ट वगैरे टाकायची गरज नाही”. सध्या त्याचे हे वक्तव्य सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.
५० खोक्यांवर रॅप बनवणाऱ्या तरुणाला अटक होताच रोहित पवार संतापले; म्हणाले…