घराचं खोदकाम चालू होतं, सापडला करोडो रुपयांचा मुघलकालीन खजिना, अन् मजूराने…

Excavation of the house was going on, Mughal treasure worth crores of rupees was found, and the laborers…

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) औरैया (Auraiya) जिल्ह्यातील कोतवाली भागातील मोहल्ला गुमती मोहलमध्ये एका घराचे उत्खनन चालू होते. एक वीट आणि काही नाणी सापडल्याची सर्वत्र चर्चा चालू आहे. कामगारांनी खूप आवाज केला त्यामुळे हे सर्व प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. हे प्रकरण समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व तपास चालू केला आहे.

काँग्रेसला मोठा धक्का! माजी केंद्रीय मंत्र्यांसह निवृत्त IAS, IPS यांचा भाजपमध्ये प्रवेश

उत्खननात सापडलेले नाणे घरमालकाने पोलिसांकडे जमा केले. परंतु, एका मजूराने सोन्याची वीट घेतली आणि तो फरार झाला अशी चर्चा रंगली आहे. CCTV footage मध्ये तो एका पातेल्यामध्ये माती वाहून नेताना कैद झाला आहे. तो कामगार मातीमध्ये एक वीट लपवून पळून गेला असल्याचे बोलले जात आहे.

मोठी बातमी! मंत्रिपदासाठी राजकीय वर्तुळात रंगली या’12 नावांची चर्चा!

गुमटी मोहळ (Gumati Mohal) येथील रहिवासी असलेले दीपक याच्या घरी बांधकाम सुरू होते. जुन्या भिंतीच पाडकाम करताना मजुरांना एक वीट आणि काही नाणी मिळाली. ही वीट मुघलकालीन आहे असं सांगितलं जातं आहे. काही लोक ही वीट अष्टधातुची असल्याचे म्हणतं आहेत. ती वीट मुघलकालीन आहे असं बोललं जात आहे आणि त्यामुळे त्याच्या मौल्यवानतेबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पेरणीआधी सरकार १० हजार रुपये देण्याच्या तयारीत? कृषिमंत्र्यांचे वक्तव्य

हे प्रकरण समजताच पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि तपास चालू केला. कोतवाल प्रमुख पंकज मिश्रा (Pankaj Mishra) यांनी माहिती दिली की, उत्खननात विटा आणि काही जुनी नाणी सापडली आहेत. ती गृह स्वामी दीपक यांनी जमा केली आहेत. सापडलेली वीट कोणत्या धातूची आहे याच्या माहितीसाठी पुरातत्व विभागाकडे(Archaeological survey of India) माहिती देण्यात आली आहे.

शेतकऱ्याचे घर जळून खाक, काही क्षणातच संसार उध्वस्त; स्वतःच्या डोळ्यासमोर घर जळलेल पाहून ढसाढसा रडला शेतकरी

त्यानंतरच या प्रकरणातील गोष्टींचा उलगडा होईल. ७ मे रोजी उत्खननात अनमोल असा खजिना सापडला आहे अशी चर्चा रंगली आहे. या प्रकरणाबद्दल पोलिसांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना घरमालकाने ही बाब सांगितली नाही. लोकांच्या चर्चेच्या माध्यमातून ही बातमी पोलिसांपर्यंत पोहोचली.

Ration Card | सामान्य नागरिकांचा त्रास होणार कमी, आता रेशनकार्ड काढता येणार ऑनलाइन पद्धतीने; एजंटला पैसे देण्याची कटकट मिटली

मिळालेल्या माहितीनुसार, बऱ्याच वर्षांपूर्वीच्या घरामध्ये उत्खननादरम्यान आधी सोन्या-चांदीने भरलेले भांडे सापडले आणि त्यानंतर मजुरांना सोन्याची वीट सापडली आहे. एक मजूर घराचे उत्खनन करत असताना हा सर्व प्रकार समजला. उत्खननादरम्यान त्या मुजराला वीट सापडली आणि तो‌ घटनास्थळावरून ती वीट घेऊन पळाला.

तुळजाभवानी मंदिरातील ड्रेस कोडवरुन अजित पवार संतापले; म्हणाले, “हाफ चड्डी घालू नका, असं…”

सीसीटीव्ही फुटेजमध्येही हे दृश्य कैद झाले आहे. त्या मुजराने डोक्यावर मातीने भरलेला ट्रे घेऊन जातानाचा व्हिडिओ कैद झाला आहे. पंकज मिश्रा यांनी माहिती दिली आहे की, पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाबद्दल चौकशी करायला सुरुवात केल्यानंतर समजेल की, ही सापडलेली नाणी कोणत्या काळातील आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *