Congress । काँग्रेसचे दिग्गज नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केलुकापासून काँग्रेसला भलंमोठं भगदाड पडलं आहे. तसेच काँग्रेस नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर (Shivraj Patil Chakurkar) यांच्या स्नूषा डॉ. अर्चना पाटील चाकूरकर (Archana Patil Chakurkar) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशातच आता काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या वाटेवर आहे, असा दावा भाजपच्याच बड्या नेत्याने केला आहे. (Latest marathi news)
“दो से भले चार, यात वाईट काय? दुसऱ्या पक्षातील अनेकजण आपल्या पक्षात आले तर शेवटी आपणच मोठे होतो. त्यामुळे मला वाटत आहे की, हा प्रश्नच राहत नाही की, तुम्हाला काय गरज राहते? मी नाव घेत नाही, पण उद्या काँग्रेसचा अतिशय मोठा नेता आमच्या पक्षात आला, तर त्याच्या अनुभवाचा फायदाच होईल,” असे वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केले आहे.
Narendra Modi । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला सर्वात मोठा खुलासा
पुढे ते म्हणाले की, ” तुम्ही रोज बघता, तरी विचारताय येणार आहे का कुणी? एवढी काय वाट बघताय तुम्ही? खूप जण येणार आहेत. आता केवळ अशोक चव्हाण आले आहेत, बाकी वेटिंगमध्ये येणार आहेत. मी नाव घेत नाही, पण उद्या काँग्रेसचा अतिशय मोठा नेता भाजपमध्ये आला, तर त्याच्या अनुभवाचा फायदाच होईल. असे विधान करत भाजपमध्ये खूप जण येणार आहेत, असा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.
Congress । काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का! विदर्भातील बड्या नेत्याने केला भाजपमध्ये प्रवेश