Site icon e लोकहित | Marathi News

राजकीय वर्तुळात खळबळ! अजित पवारांची चलबिचल; चर्चांना उधाण

Excitement in political circles! Ajit Pawar's move; Inviting discussions

मागच्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणामध्ये अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादीमध्ये नाराज असून ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरु आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) खळबळ माजली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा अजित पवारांना पाठिंबा; म्हणाले, “अजित दादा जिकडे जाणार तिकडे…”

राष्ट्रवादीचे महत्वाचे मानले जाणारे नेते अजित पवार (Ajit Pawar) 40 आमदारांसोबत भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात चांगल्याच रंगल्या आहेत. आज जे  दिसतं, त्यामागे असंख्य दिवसांपूर्वी खेळलेल्या चाली असतात. अशा चर्चा सुरु आहेत. मागच्या दहा दिवसापूर्वीच म्हणजे ७ एप्रिलला 17 तास अजित पवार नॉटरिचेबल. होते अशा चर्चा देखील सुरु होत्या.

विरोधकांनी केलेल्या टीकेला उदय सामंतांचे उत्तर; म्हणाले, “म्हणून महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा संध्याकाळी घेतला नाही…”

त्यांनतर पुन्हा अजित पवार पुण्यात एका कार्यक्रमात दिसले आणि तब्येत ठीक नसल्याचं कारण देखील दिल होत. यांनतर कालदेखील अजित पवार यांनी सर्व कार्यक्रम रद्द केले आणि आज 18 एप्रिलला विधानभवनात दिसले. त्याचबरोबर राज्यभरातील महत्त्वाचे राष्ट्रवादीचे आमदारही मुंबईच्या दिशेने निघाले. या सगळ्या घडामोडी घडल्या अन् दुपारनंतर पवारांनी स्पष्ट बोलत. चर्चांना आता पूर्णविराम देत ते माध्यमांवर चिडले. त्यांच्या चेहऱ्यावरील चलबिचल अस्वस्थता झाकून राहिली नाही. त्याचबरोबर संजय राऊतांना खडसावलं. मात्र अजित पवार बंडाच्या पवित्र्यात होते. पण असं काय घडलं की गोष्टी पुढे गेल्याच नाहीत? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.

अजित पवार पुण्यातील दौरा रद्द करून गायब! राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता; चर्चांना उधाण

Spread the love
Exit mobile version