
सध्या एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पुण्याच्या मावळ या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी संरपंच यांची अज्ञात व्यक्तींनी कोयत्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी शिरगाव परिसरात घडली आहे.
उर्फीने केले सर्वांना एप्रिल फुल; म्हणाली, “मी बालिश…”
अज्ञात लोकांनी कोयत्याने वार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी संरपंच यांची हत्या केली आणि नंतर घटनास्थळावरून पळ काढला. आता याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी तपासाला सुरवात केली आहे. माहितीनुसार, प्रवीण गोपाळे असे ठार झालेल्या सरपंचाचे नाव आहे.
ब्रेकिंग! क्रिकेट विश्वावर शोककळा; भारताच्या माजी क्रिकेटपटूचे निधन
सूत्रांच्या माहितीनुसार, प्रवीण हे शनिवारी रात्री शिरगावच्या प्रतिशिर्डी साईबाबांच्या मंदिरासमोर आले होते. त्यावेळी दुचाकीवरून काही अज्ञात व्यक्ती आले आणि त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. यानंतर तेथिल स्थानिक लोकांनी त्यांना ताबडतोड रुग्णालयामध्ये देखील नेले. मात्र उपचार करण्याआधीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे मंदिर परिसरात देखील गोंधळ उडाला होता.
अमोल कोल्हे अमृता खानविलकरबरोबर अडकणार लग्नबंधनात? चर्चांना उधाण
आता याप्रकरणाची पोलीस कसून चौकशी करत आहे. या घटनेतील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासत आहेत. ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, मागच्या काही महिन्यांपूर्वी शिरगाव ग्रामपंचायतची निवडणूक झाली होती. यामध्ये राष्ट्रवादी गटाचे प्रवीण गोपाळे हे सरपंच पदी निवडून आले होते.
देवेंद्रजी, राजीनामा द्या!; सुप्रिया सुळेंच्या विधानावर फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…