
सेलिब्रेटी सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. लोकांना त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुकता वाटतं असते. यासाठी बॉलिवूड कलाकार ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी लोक पोहचतात आणि त्याच्यासोबत फोटो देखील काढतात. मात्र सोशल मीडियामुळे सेलिब्रिटींचं खासगी आयुष्य अजिबात खासगी राहिलेलं नाही.
मोठी बातमी! अग्निवीर भरतीमध्ये आता ‘या’ शाखेतील विद्यार्थीदेखील करू शकणार अर्ज
त्यामुळे सेलिब्रेटींना त्याच घर ही जागा सर्वात सुरक्षित वाटते. मात्र जर घरात देखील गोपनीयतेचा भंग झाला तर काय त्रास होतो, हे आपण सर्व समजू शकतो. असच काही प्रकार अभिनेत्री आलिया भट्ट हिच्यासोबत घडला आहे. आलिया तिच्या घरात आराम करत असताना दोन पापाराझींनी फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.
संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देणारा राजा ठाकूर नेमका कोण आहे?
सध्या आलियाचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. मात्र ज्यावेळी आलियाला फोटो व्हायरल झाल्याची माहिती मिळाली तेव्हा तिला हे पाहून धक्का बसला. आता याबाबत आलियाने मुंबई पोलिसांना यावर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे.
सपना गिलने केले पृथ्वी शॉ वर गंभीर आरोप; म्हणाली, “त्यांनी माझ्या प्रायव्हेट पार्टला…”