खळबळजनक घटना! धावत्या रेल्वेत प्रवाशाला पेटवले

Exciting event! A passenger was set on fire in a running train

सध्या एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे प्रवाशाला जीवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ठाण्याच्या मुब्रामधून (Mubra of Thane) ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

नवीन जोडपे लग्नानंतर जेजुरीलाच का जातात? जाणून घ्या याबाबत माहिती

घटना घडली अशी की, रुमालाला आग लावून तो रुमाल एका अपंग प्रवाशाच्या अंगावर फेकण्यात आला. यावेळी या घटनेमध्ये प्रवाशाच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.

माणसाने चालत्या मेट्रोतून मारली उडी, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

हा प्रवाशी जखमी होताच त्याला रुगणल्याच्या दिशेने हलविले. विशेष म्हणजे या प्रवाशाच्या उपचारासाठी जवळपास बारा तास बेड मिळाला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रवाशाला कळव्याच्या छत्रपती रुग्णालयात (Chhatrapati Hospital) दाखल केले असता त्या ठिकाणी उपचाराची सोय नसल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर या प्रवाशाला उपचारासाठी केईएम रुग्णालयात (KEM Hospital) दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

“तू चीज बडी हैं मस्त मस्त…”, गाण्यावर थिरकली गौतमी पाटील; पाहा Video

आता या प्रकरणातील आरोपींचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती रेल्वे लोहमार्ग पोलिसांकडून (Railway Police) देण्यात आली आहे.

मालेगावमध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार; आज होणार जाहीर सभा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *