नाशिक (Nashik) जिल्ह्यामध्ये सध्या एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोग्य केंद्रात (Health Centers) डॉक्टर-नर्स नसल्याने मुलीच्या आईनेच मुलीची प्रसूती केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारामुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.
मोठी बातमी! चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आरोग्य विभागामध्ये एका आईनेच पोटच्या मुलीची प्रसूती केली आहे. बाळंतपण झालेल्या महिलेची आई म्हणाली, आरोग्य केंद्रामध्ये माझ्या मुलीची प्रसूती करण्यासाठी कोणीही उपस्थिती नव्हते. मी स्वतः तिची प्रसूती केली आहे.
त्याचबरोबर, ज्यावेळी डिलिव्हरीसाठी मुलीला आरोग्य केंद्रात आणण्यात आले त्यावेळी दरवाजा देखील बंद होता. रुग्णालयात सिस्टर-डॉक्टर कोणीही नव्हतं, त्यामुळे आम्ही दोन महिलांनी मिळून मुलीची डिलिव्हरी केली असल्याचं त्या महिलेने म्हंटल आहे. आरोग्य केंद्रामध्ये अधिकारी आणि कर्मचारी केंद्र सोडून गायब असल्याचा आरोप देखील या महिलेला केला आहे. या सर्व प्रकारामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
नाद करा पण आमचा कुठं! ट्रॅक्टरने नव्हे तर महिंद्र THAR ने नांगरले शेत; लोक म्हणाले…