रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन येणाऱ्या बसचा अचानक अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात बस 10- 15 फूट खाली कोसळली असून 10 जण जखमी झाले आहेत.
तरुणाने लुडो गेममध्ये ६० लाख रुपये गमावले; वाचा सविस्तर
माणगाव ते रायगड (Mangaon to Raygad) सहलीसाठी आलेल्या या बसमध्ये पालक व मुले बसलेली होती. सहलीचा आनंद घेऊन माणगावकडे परतीचा प्रवास सुरु असताना बसच्या चालकाचा ताबा सुटल्यानं बस रस्त्यावरुन 15 ते 20 फूट खाली दरीमध्ये कोसळली व हा अपघात झाला. अशी माहिती सूत्रांनी दिली.
मोठ्या कंपन्यांचे ‘मोठे’ धक्के! अचानक एवढ्या कर्मचाऱ्यांना काढले कामावरून
अपघात होताच घटनास्थळी धाव घेत स्थानिकांनी पोलिसांना कळवले. यावेळी अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना पोलिसांनी तात्काळ माणगाव येथील रुग्णालयात हलवले.
युवा शेतकऱ्यांचा स्वस्तात मस्त फंडा; मिरचीच्या किडीवर शोधला ‘हा’ उपाय
स्थानिक ग्रामास्थ आणि बाकीच्या लोकांच्या सहकार्यामुळं योग्य तो प्राथमिक उपचार ( First Aid) झाला असल्याची माहिती यावेळी पोलिसांनी दिली आहे. अपघातग्रस्तांमध्ये लहान मुले व महिलांचा देखील समावेश आहे.