
Maratha Reservation । जालन्यात मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज (Jalna Protest) झाल्याने राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नुकतंच याबाबत एक वक्तव्य केले आहे. त्यावरून हे आंदोलन पुन्हा चिघळले आहे. फडणवीसांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. (Latest Marathi News)
Sonia Gandhi । बिग ब्रेकिंग! सोनिया गांधी यांची तब्बेत अचानक बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
“भारतीय जनता पक्षाने (BJP) त्यांना पक्षात ठेवू नये. त्यांना लवकरात लवकर पक्षातून काढून टाका नाहीतर ते मराठ्यांना गोळ्या घालून मारतील. त्यांचे विधान हे मराठा विरोधी आहे. त्यांना आम्ही एक चांगली व्यक्ती समजत होतो. परंतु त्यांच्या या विधानावरून त्यांना मराठा समाजाबद्दल किती राग आहे हे स्पष्ट होते. त्यांच्या विधानामुळे पक्षातील कित्येक मराठा चेहरे नाराज झाले आहेत,” असा दावा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केला आहे. (Jalana News)
आंदोलनकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांची प्रतिकृती असणारे टरबूज पायाखाली चिरडून निषेध व्यक्त केला आहे. त्यांचे वक्तव्य गृहमंत्रीपदाला शोभत नाही. त्यांनी येत्या 48 तासात राजीनामा द्यावा, नाहीतर मराठा समाज वेगळ्या पध्दतीने आंदोलन छेडेल असा इशारा दिला आहे. त्यामुळे आता भाजप आणि फडणवीसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Pune Bharti 2023 । नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! पुण्यात ‘या’ ठिकाणी सुरु आहे बंपर भरती