ST Bus । दिवाळीपूर्वीच महागला लालपरीचा प्रवास, एसटी महामंडळाकडून तिकीट दरात मोठी वाढ

ST Bus

ST Bus । दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. प्रत्येकजण या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो. कित्येक कर्मचारी, विद्यार्थी सणाच्या निमित्ताने घरी जात असतात. महाराष्ट्रात लालपरीने म्हणजेच एसटीने (ST) प्रवास करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. कारण लालपरीचे तिकिटाचे दर खूप कमी असतात. अशातच आता एसटी महामंडळाकडून तिकीट दरात मोठी वाढ (ST Ticket Fare Hike) करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

Eknath Shinde । शिंदे सरकारचा मोठा निर्णय! मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार ‘या’ सवलती

राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे वाढलेले दर कमी झाले नाहीत. अशातच आता महामंडळाचा प्रवास वाढल्याने सर्वसामान्य हैराण झाले आहेत. दरम्यान, एसटी महामंडळाने १० टक्के भाडेवाढीचा निर्णय घेतला असून ही दरवाढ मंगळवारपासून (ता. ७) लागू होणार आहे. दरवाढ २७ नोव्हेंबरपर्यंत कायम असेल. या नवीन दरानुसार आता छत्रपती संभाजीनगर ते पुणे हे प्रवास भाडे ५५५ आणि छत्रपती संभाजीनगर ते मुंबई हे भाडे ९१५ रुपये असेल.

Success Story । मेहनतीच्या जोरावर कोरडवाहू जमिनीत पिकवले सोने, कशी केली या शेतकऱ्याने सुरुवात, एकदा वाचाच

नवीन दरवाढीमुळे प्रवाशांना छत्रपती संभाजीनगरातून पुणे-मुंबईला जाण्यासाठी साध्या बससह शिवशाहीने जाण्यासाठी ५० ते १०० रुपये जास्त मोजावे लागतील. ही दरवाढ साधी, जलद, निमआराम, साधी शयन आसनी, वातानुकूलित शिवाई, शिवशाही या बससाठी असेल, हे लक्षात घ्या. त्यामुळे जर तुम्ही येत्या काही दिवसात बसने प्रवास करणार असाल तर तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील.

Namo Shetkari Yojana । तुम्हालाही घेता येणार 12 हजारांचा लाभ, पण मान्य करावी लागेल ‘ही’ अट

Spread the love