नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सुरगाणा (Surgana) तालुक्यातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सहलीसाठी आलेल्या एका विद्यार्थ्यांचा पाय घसरून खोल दरीत कोसळल्याने मृत्यू झाल्याची धक्कदायक घटना घडली आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
मोठी बातमी! ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मित्रांसोबत सहलीला आलेल्या मुलाचा साखळचोंड धबधब्यावरुन पाय घसरला व तो खोल दरीत पडून त्याचा मृत्यू झाला. फिरण्यासाठी आलेली सर्व मित्र एक ते दीड वाजण्याच्या सुमारास उंबरपाडा तातापाणी या ठिकाणी साखळचोंड येथील शॉवर पॉईंट धबधब्यावर अंघोळ करत होते. यावेळी त्या मुलाचा पाय घसरून त्यांच्या डोक्याला मर लागला व यामध्येच त्याचा मृत्यू झाला.
कांद्याचे दर घसरले, खर्चही निघेना; शेतकरी राजा संतप्त
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहचली व मृतदेह बाहेर काढला. या घटनेने तेथील आसपासच्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
थंडीच्या दिवसांत केळी व पपईच्या बागांची अशी काळजी घ्या; अन्यथा होऊ शकते नुकसान