मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उदय सामंत (Uday Samant) आणि यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षाच्या उपनेतेपदावरून उदय सामंत आणि यशवंत जाधव यांची हकालपट्टी करण्यात आलीये. मागच्या दोन महिन्यांपूर्वी शिवसेनेते मोठी बंडखोरी झाली होती. यावेळी एकनाथ शिंदेनी शिवसेनेविरोधात बंड केले. त्यांच्या या बंडाला शिवसेनेतील एका मोठ्या आमदारांच्या तसेच पदाधिकाऱ्यांच्या गटाने पाठिंबा दिला. यामध्ये उदय सामंत आणि यशवंत जाधव हे देखील सामील होते.
एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. नंतर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण आता ज्यांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिलाय त्यांची शिवसेनेमधून हाकलपट्टी करण्यात आली आहे
Satara: साताऱ्यात जादूटोणा करत तरुणीवर बलात्कार , आरोपीला अटक
एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेतील एका मोठ्या आमदारांच्या गटाने शिंदे यांना पाठिंबा केला होता. जवळपास 50 आमदारांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला होता. आमदारांसोबतच शिवसेनेचे अनेक पदाधिकारी देखील शिंदे गटात सहभागी झाले होते. त्यामुळे आता जे शिंदे गटात सहभागी झाले आहेत त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.