Dhangar Reservation । धक्कादायक! धनगर आरक्षणासाठी युवकाचा टोकाचा निर्णय, संपवलं जीवन

Dhangar Reservation

Dhangar Reservation । परभणी : मागील काही दिवसांपूर्वी आरक्षणाच्या (Reservation) मुद्द्यावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. अगोदर मराठा समाज (Maratha Reservation) नंतर धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. अशातच आता एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. (Latest marathi news)

Ajit Pawar । शरद मोहोळ हत्या प्रकरणी अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

धनगर आरक्षणासाठी एका युवकानं जीवन संपवलं आहे. तरुणाने आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने या तरुणाने हा निर्णय घेतला आहे. परभणी (Parbhani) तालुक्यातील आर्वी गावात राहणाऱ्या युवकाने धनगर आरक्षणासाठी शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. शिवाजी दत्तराव कारके, असे या मृत युवकाचे नाव असून त्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट होती.

Anganvadi Strike। अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनावर तोडगा निघेना, नऊ हजार कर्मचाऱ्यांनी पुकारला संप

आरक्षणाची मागणी पूर्ण होत नसल्याने मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे, असं त्याने सुसाईड नोट लिहिलं आहे. पोलिसांनी ही चिठ्ठी ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. एसटी प्रवर्गातून धनगर आरक्षण द्यावे अशी धनगर समाजाची मागणी आहे.

Rohit Pawar । बारामती अ‍ॅग्रो कारवाईनंतर रोहित पवारांची पत्रकार परिषद, अजित पवारांवर साधला निशाणा

Spread the love