Fact check | जेठालाल फेम दिलीप जोशीकडे आहे कोट्यवधी रुपयांची संपत्ती; आकडा एकूण व्हाल थक्क

Fact check Dilip Joshi of Jethalal fame has a wealth worth crores of rupees; The total number will be staggering

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ( Tarak Mehata ka oolta Chashma) ही मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय मालिका आहे. गेली कित्येक वर्षे ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील मजेशीर पात्रे लोकांना आपली वाटतात. दया बेन, जेठालाल, टप्पू सेना, तारक मेहता आणि या मालिकेतील इतर कुटुंबे आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. या मालिकेमध्ये जेठालालची भूमिका साकारणाऱ्या दिलीप जोशी (Dilip Joshi) यांच्या संपत्तीबद्दल मध्यंतरी बऱ्याच चर्चा झाल्या होत्या. त्यांच्याकडे महागड्या गाड्या आणि कोट्यवधींची संपत्ती असल्याचे वृत्त सतत येत असते. ( Dilip Joshi on rumours of property)

एलपीजी गॅस सिलिंडर मिळणार आता अर्ध्याहून कमी किंमतीत! सरकारने सुरू केली ‘ही’ योजना

या पार्श्वभूमीवर स्वतः दिलीप जोशी यांनी मोठा खुलासा केला आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी याबाबत आपले मौन सोडले. ते म्हणाले की, “आजकाल लक्ष वेधून घेण्यासाठी लोक काहीही लिहितात. माझ्या नसलेल्या संपत्तीबाबत अनेकदा बातम्या आल्या आहेत. माझ्याकडे ऑडी Q7 असल्याचे देखील म्हंटले जात होते. मात्र मी त्यांना म्हणतो, मला पण सांगा कुठे आहे ? मी पण चालवीन.”

दोन विषयात नापास! विद्यार्थीनीने तणावाखाली उचलले चुकीचे पाऊल; नाल्यात सापडला मृतदेह

तसेच आणखी कुणीतरी लिहिले की,”माझ्याकडे स्विमिंग पूल असलेलं घर आहे. मी म्हणालो की,”मुंबईत स्विमिंग पूल असलेलं घर मिळालं तर यापेक्षा मोठं काय असेल”. असेही दिलीप जोशी यावेळी म्हणाले. दिलीप जोशी यांनी १९८९ मध्ये बॉलिवूड मध्ये पदार्पण केले. मैने प्यार किया, वन 2 का 4 , फिर भी दिल है हिंदुस्तानी व हम आपके है कौन या चित्रपटांमध्ये दिलीप जोशी यांनी काम केले आहे.

शरद पवार यांच्या घरी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? जयंत पाटील म्हणाले…

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *