Devendr Fadanvis-Ajit Pawar: मेटेंच्या अपघातावर फडणवीस आणि अजित पवारांनी केली ‘ ही’ चर्चा

Fadnavis and Ajit Pawar had 'this' discussion on Mette's accident

मुंबई : 14ऑगस्ट रोजी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे (vinayak mete)यांचा मुंबईला येत असताना खोपोली बोगद्याजवळ अपघात (accident)झाला. या अपघातात मेटेंच जागीच निधन झालं.विधानसभेत विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Fadanvis), विरोधी पक्षनेते अजित पवार(ajit pawar) यांनी चर्चा केली.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात चर्चा

विनायक मेटेंच्या अपघाताला एक्स्प्रेस वेवरील अवजड वाहतूक जबाबदार आहे.यामुळे चौथ्या लेनचा विस्तार सरकारने करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.यावर एक्स्प्रेस वेवर जी काही कोंडी होतेय, त्यावर तोडगा काढू. चौथ्या लेनचे कामही करू, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.तसेच राजकीय नेत्यांनी रात्रीचा प्रवास(journey) टाळावा, असे आवाहनही फडणवीस यांनी नेत्यांना केले.

Mohit Kamboj: “बारामती ॲग्रोचा अभ्यास सुरु” अडचणीत येणारा राष्ट्रवादीचा पुढचा नेता रोहित पवार?, मोहित कंबोज यांचा इशारा

अजित पवार काय म्हणाले

चर्चेवेळी अजित पवार म्हणाले की , ट्रक चालकांना एका लाईनमध्ये जाण्यास सांगितले तरी ते जाणार नाहीत.आणि महत्वाचं म्हणजे ट्रकच्या बाजुने जाण्यास छोट्या वाहनांचे चालक घाबरतात. म्हणून जर एक्स्प्रेस वेचा विस्तार केला तर ट्रक चालकांना दोन लेन देता येतील. कारण त्यांनाही ओव्हरटेक मारावी लागते. म्हणून चौथ्या लेनचा विस्तार सरकारने करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.तसेच पोलीस ठाण्यांनी हद्दीचा प्रश्न आणू नये. अनेकदा पोलीस हे माझ्या हद्दीत नाही, त्याच्या हद्दीत असेल असे म्हणतात.

Sharmila Thackeray: शिवसेना नेमकी शिंदे गटाची की ठाकरेंची, शर्मिला ठाकरेंनी दिलं उत्तर

फडणवीस काय म्हणाले

राज्य सरकार मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमचा(ITMS) वापर करण्याच्या विचारात आहे. तसे झाल्यास एक्सप्रेस वर होत असलेल्या हालचालींवर योग्य पद्धतीने लक्ष ठेवणे सोयीचे होईल अस फडणवीस म्हणाले.पुढे ते म्हणाले की , जर ११२ क्रमांकावर जेव्हा कोणताही व्यक्ती मदतीसाठी फोन करेल त्यावेळी तो मोबाईल वरूनच फोन करेल हे गृहित धरून थेट त्या व्यक्तिच्या फोनचे लोकेशन पोलिसांना कळेल.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *