Devendra Fadnavis । नांदेड : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) तोंडावर सर्व राजकीय पक्ष आणि राजकीय नेते तयारीला लागले आहेत. प्रचारादरम्यान, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. नुकतीच नांदेडमध्ये भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांच्या प्रचारासाठी सभा पार पडली. या सभेला गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. (Latest marathi news)
Lok Sabha Elections । सर्वात मोठी बातमी! वंचितकडून लोकसभेसाठी आणखी 10 उमेदवार रिंगणात; पाहा यादी
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. “ना घर का ना घाट का अशी काँग्रेस (Congress) पक्षाची अवस्था झाली आहे. जागावाटप होत असतं, एकमेकांच्या जागा एकमेकांना मिळत असतात. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची जागा जाहीर करुन टाकली, पण काँग्रेसला त्याचा पत्ताच नाही. शरद पवारांनी भिवंडीची जागा घोषित केली, ती देखील काँग्रेसला माहिती नाही,” असे फडणवीस म्हणाले आहेत.
Praful Patel । शरद पवार सत्तेत सहभागी होण्यास तयार होते, प्रफुल्ल पटेलांच्या दाव्याने राजकीय भूकंप
पुढे फडणवीस म्हणाले की, “काँग्रेस हा पक्ष फरफटत चालला आहे. कुणाचा पायपोस राहिला नाही. अशा प्रकारच्या काँग्रेस पक्षाला नेता नाही, नीती नाही. मागच्या वेळी लोकसभेला त्यांची एक जागा आली होती. आपल्याला आता काँग्रेस पक्षाला शून्यावर आणायचं काम करायचं आहे”, असे आवाहन यावेळी फडणवीस यांनी नांदेडमध्ये केले आहे.