Ashish Shelar : फडणवीस भगवान कृष्ण तर एकनाथ शिंदे कर्ण – आशिष शेलार

मुंबई : आज भाजपचे नेते आशिष शेलार(Ashish shelar) यांनी शिवसेनेवर हल्ला केला आहे. यावेळी आशिष शेलार यांनी देवेंद्र(Devendra Fadanvis) फडणवीस यांची भगवान कृष्ण आणि एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांची कर्ण अशी तुलना केली आहे.

आशिष शेलार म्हणाले की कौरव आणि पांडवांमधील युद्ध जेव्हा अटळ होत तेव्हा भगवान श्री कृष्ण कर्णाला सांगायला गेले की हे युद्ध अटळ आहे तू मध्ये पडू नको.हे युद्ध कर्म आणि धर्म यामधल आहे. पण कौरवाने भगवान श्री श्रीकृष्णाचे ऐकल नाही. युद्ध अटळ होते , कौरव पराभूत झाले आणि कर्णाचा वध झाला.
पण आजच महाराष्ट्रातल महाभारत(mahabarat) वेगळं आहे.

देवेंद्ररुपी कृष्णाने एकनाथरुपी कर्णाला त्या ठिकाणी युद्धातून बाजूला काढलय. त्यामुळे भ्रष्टाचार विरोधाच्या लढाईत कृष्णबी आमच्या बरोबर आहे आणि कर्ण पण सोबत आहे. महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर आता कोणी थांबवु शकत नाही. मुंबईकर गुदमरलाय. मुंबईकर गुदमरून आव टाव करतोय की आम्हाला लोकशाहीचं सरकार हवंय. आम्हाला मुंबई महानगर पालिकेत मुंबईकरांची सत्ता हवीय आणि ही सत्ता देवेंद्र फडणविसांच्या नेतृत्वाखाली मिळेल.

याआधी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना काल बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना भाजप सरकारवर टीका केली. मुंडे म्हणाले की इडीचा इ म्हणजे एकनाथ शिंदे आणि ड म्हणजे देवेंद्र फडणवीस.केंद्रीय तपास यंत्रणांचा(ED)भाजप सरकार दुरुपयोग करत आहे. आणि दुरुपयोग मोदी सरकार काही आज करतय आस नाही तर गेली साडेसात वर्षे झाली मोदी सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा स्वतःसाठी उपयोग करून घेत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *