पुणे : कसबा व चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात वेगाने हालचाली घडत आहेत. कसबा (Kasba Election) विधानसभा पोटनिवडणुक बिनविरोध होणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र दोन्ही प्रमुख पक्षांनी काल आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
मला राजकारणात यायचं नव्हतं पण…”, राज ठाकरे यांनी केला मोठा खुलासा
आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचा मृत्यु झाल्याने कसबा पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. या पोटनिवडणुकीत नाट्यमय घडामोडी पहायला मिळत आहेत. सुरवातीला कसब्याची जागा कोण लढणार यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. यानंतर दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना ‘कसब्या’ मधून उमेदवारी मिळणार अशा वावड्या उठल्या होत्या. मात्र भाजपाने त्यांची उमेदवारी नाकारली. त्याठिकाणी हेमंत रासने यांना पक्षाकडून संधी देण्यात आली.
राखी सावंतने केला धक्कदायक खुलासा; म्हणाली, “आदिलने मला लाथेने मारलं…”
परंतु, यामुळे शैलेश टिळक यांनी नाराजी दर्शवली. टिळक कुटुंबाची नाराजी ही भाजपला परवडणारी नाही. हे लक्षात घेता, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शैलेश टिळक यांच्याशी संवाद साधला. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
अजित पवारांनी सांगितले डोक्यावरील केस जाण्याचे कारण; म्हणाले, “रामदेव बाबांनी सांगितले म्हणून…”
दरम्यान, कुणाल टिळक यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस सातत्याने संवाद साधत आहेत. ‘सांभाळून घ्या. आणि सक्रिय प्रचार करा.’ अशी विनंती भाजपकडून टिळक कुटुंबाकडे करण्यात आली आहे. यानंतर टिळक कुटुंब प्रचारात सक्रिय झाल्याने दिसून येत आहे.
गद्दारांचे सरकार फक्त होर्डिंग्जवाल्यांची कर्ज मुक्ती करत आहे; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट