ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना लॉरेंस बिश्नोई (Lawrence Bishnoi) यांच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी सगळीकडे खळबळ उडाली आहे. धमकी देणारा व्यक्ती हा पुण्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी पुण्यातील एका २३ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं आहे. पंजाबमधील खतरनाक गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने ही धमकी देण्यात आली आहे.
धक्कादायक! जळगावमध्ये वडिलांवर आणि मुलावर मधमाशांनी केला हल्ला अन् हल्ल्यात वडिलांचा दुर्दैवी मृत्यू
राऊतांना देण्यात आलेल्या धमकीनंतर संजय राऊतांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहे. यावर आता फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. माहितीनुसार तरुणाने दारूच्या नशेत धमकी दिली असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यामुळे आता फडणवीसांच्या वक्तव्याच्या चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.
पुण्यातील भाजपच्या बॅनरबाजीवर अजित पवार यांनी व्यक्त केला संताप; म्हणाले…
दरम्यान, संजय राऊत धमकी प्रकरणी पुण्यातून एका २३ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, राहुल तळेकर या तरुणाला पुण्यातील गुन्हे शाखेने काल रात्री उशिरा ताब्यात घेतले. पुण्यातील खराडी भागात पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.
शिर्डीच्या साईबाबा मंदिरात भक्त आणि सुरक्षारक्षकांनमध्ये हाणामारी; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल