Site icon e लोकहित | Marathi News

Maharashtra Politics । माढ्यात फडणवीसांची नवी चाल, मोहिते- पवार गटाला दिला मोठा धक्का

Maharashtra Politics

Maharashtra Politics । राज्यात लोकसभा निवडणुकीची (Loksabha election) रणधुमाळी सुरु आहे. राज्यात यंदा कोणाचे सरकार येणार हे येत्या काळात स्पष्ट होईल. महाविकास आघाडी आणि महायुतीने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पण काही जागांवर पेच कायम आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोहिते- पवार गटाला मोठा धक्का दिला आहे.

Bus Accident । भीषण बस अपघात! सात जणांचा जागीच मृत्यू

माढा लोकसभा मतदारसंघात फडणवीसांनी मोठा डाव टाकून विजयसिंह मोहिते पाटील (Vijay Singh Mohite Patil) यांचे पुतणे धवलसिंह मोहिते पाटील (Dhavalsingh Mohite Patil) यांना सोबत घेतलं आहे. तसेच शरद पवार गटाचे नेते अभिजीत पाटील (Abhijit Patil) यांना देखील आपल्या सोबत घेतलं आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी मोहिते- पवार गटाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. याचा निवडणुकीवर परिणाम होईल.

Chhagan Bhujbal । अजित पवार गटनेते छगन भुजबळ यांचे शरद पवार-उद्धव ठाकरेंबाबत सर्वात मोठे वक्तव्य

दरम्यान, शरद पवारांनी माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी जाहीर करून तर उत्तम जानकरांना सोबत घेऊन अजित पवारांची शरद पवारांनी डोकेदुखी वाढवली होती. यामुळे माढ्यात भाजप बॅकफूटवर गेल्याची सुरु चर्चा होती. पण अखेर देवेंद्र फडणवीसांनी मोठा डाव टाकला आहे. याला आता शरद पवारांना काय प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Baramati News । बारामतीत गावागावात धमकीसत्र, बड्या नेत्याचा अजित पवारांवर गंभीर आरोप

Spread the love
Exit mobile version