गेल्या सात दिवसांपासून राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि इतर अधिकाऱ्यांनी संप पुकारला होता. आता तो मागे घेत असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये संप करणाऱ्यांची प्रमुख मागणी ही जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी होती. आता याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं संप समन्वय समितीकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे हा संप मागे घेण्यात आला आहे. आता यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कर्मचाऱ्यांनी संप मागे घेताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली महत्वाची माहिती!
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही मान्य केल्या आहेत. याची कार्यवाही करण्यासाठी एक समिती काम करत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारच्या वतीने सांगू इच्छितो की, सगळे कर्मचारी आमचेच आहेत. त्यांना जे चांगल्यात चांगलं देता येईल, ते देण्याचा प्रयत्न करणं ही आमची जबाबदारी आहे.” असं फडणवीस म्हणाले आहेत.
पठ्ठ्याचा नादच खुळा! चक्क बायकोच्या वाढदिवसासाठी ठेवला गौतमी पाटीलचा कार्यक्रम
दरम्यान, संपकऱ्यांच्या मागणीसाठी राज्य सरकारने एक अभ्यास समिती स्थापन केली असून येत्या तीन महिन्यात याबाबत अहवाल देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. जुन्या पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक आहेत असं समन्वय समितीकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे हा संप मागे घेण्यात आला आहे.