Site icon e लोकहित | Marathi News

“फडणवीसांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा”, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

Fadanvis

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून या सरकारला सतत विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. वेगवगेळ्या मागण्यांसाठी विरोधक वारंवार आंदोलन करता आपल्याला पाहायला मिळतात. परंतु, आता थेट देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी पुणे (Pune) शहरात आंदोलन केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) फडणवीसांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाला आहे.

सर्वात मोठी बातमी! मंत्रिमंडळाच्या बैठकीत १९ हजार कोटींच्या खर्चाला मंजुरी

नुकताच सदाशिव पेठेत (Sadashiv Peth) एका तरुणीवर जीवघेणा हल्ला झाला. यापूर्वीही महिलांवर सतत हल्ले होत आहेत. त्यावरून आता राज्य सरकारला (State Govt) विरोधकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. शहरात सतत महिलांवर आणि मुलींवर हल्ले होत आहेत. त्यामुळे राज्याचं गृहखातं काय करत आहे? असा सवाल संतप्त आंदोलनकर्त्या महिलांनी सरकारला केला आहे.

जेवण तयार केले नाही म्हणून रागाच्या भरात पतीने पत्नीला डांबले आणि केले भयानक कृत्य

पुणे शहरातील गुडलक चौकात राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे राज्य सरकार आणि गृह खात्याविरोधात बुधवारी आंदोलन केले आहे. कुंभकर्णासारखे झोपलेले गृहमंत्री जागे व्हा, अशा घोषणा देत या सरकारला महिलांच्या सुरक्षेबद्दल काही वाटत नाही. जर फडणवीसांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला तरच महिला सुरक्षित राहतील, असा दावा यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, भीषण अपघातात एक जागीच ठार तर ६ जण जखमी

Spread the love
Exit mobile version