महाविकास आघाडीबद्दल बोलताना फडणवीसांची जीभ घसरली; म्हणाले, “मी त्यांच्या बापालाही…”

Fadnavis slips his tongue while talking about Mahavikas Aghadi; Said, "I also told his father..."

नाशिकमध्ये (Nashik) शुक्रवारवापासून भाजपची दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणी बैठक (Regional Executive Meeting) सुरू झाली आहे. आज या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते. या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर जोरदार टीका केली आहे. मात्र, टीका करताना फडणवीसांची जीभ घसरली.

मोठी बातमी! महाविकास आघाडीतील 20 ते 22 आमदार सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात

देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडी सरकारचा मला जेलमध्ये टाकण्याचा प्लॅन होता. मात्र मी त्यांच्या बापालाही घाबरत नाही. ज्या लोकांना मला जेलमध्ये टाकण्याची जबाबदारी दिली होती आता स्वतः ते लोक जेल मध्ये आहेत. असं फडणवीस यावेळी म्हणाले आहेत. त्याचबरोबर हे सरकार गद्दारांचं नाहीतर खुद्दारांचं सरकार आहे. २०१९ मध्ये ज्यांनी पाठीत खंजीर खुपसलं ते गद्दार होते, असं देखील यावेळी फडणवीस म्हणाले आहेत.

नवऱ्याबरोबर राहत नसलेल्या चर्चांवर अमृता खानविलकरने दिली प्रतिक्रिया, म्हणाली…

दरम्यान, नाशिकमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी निवडणुकांसाठी भाजपने ‘महाविजय २०२४’ हा संकल्प केला आहे. अशी मोठी घोषणा देखील केली आहे.

‘काहे दिया परदेस’ फेम सायली संजीवची ती पोस्ट चर्चेत; अशोक सराफ यांना ‘या’ नावाने मारते हाक

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *