“फडणवीस मोंदींची थुंकी झेलून म्हणाले”…. ‘सामना’ तून भाजपवर बोचरी टीका

BJP

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच आता पुन्हा एकदा सामना या दैनिकातून भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. “देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे नरेंद्र मोंदींची (Narendra Mondi) थुंकी झेलून मी पुन्हा येईन, असे म्हणाले होते. परंतु ते येताना दोघांना घेऊन आले. हे दोघे म्हणजे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार. या दोघांवरही भ्रष्टाचाराचे खूप आरोप आहेत. त्यामुळे मी येताना भ्रष्टाचार आणि लुटीचा माल घेऊन येईल असे फडणवीस यांना म्हणायचे असावे, अशी बोचरी टीका दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

भीषण अपघात! ट्रकने चार वाहनांना चिरडले, एकाच जागीच मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी

“नुकताच मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) आणि केसीआर (KCR) सरकारचा भ्रष्टाचारी म्हणून उल्लेख केला होता. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीला मांडीवर घेतलं. मोदी ज्यांना भ्रष्टाचारी ठरवतात तेच पक्ष किंवा नेते भारतीय जनता पक्षाचे सत्तेतील मित्र पक्ष बनतात. जर काँग्रेस (Congres) लूट की दुकान असेल तर भाजप लुटीचा माल विकत घेऊन आपले घर का भरत आहे? असा सवालही सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.

“सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आगामी निवडणूका लढवण्याची माझी मानसिकता नाही”, राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराकडून खदखद व्यक्त

. “खरंतर भाजप हाच आता राष्ट्रीय चोर बाजार झाला असून आता तो चोरीचा, लुटीचा माल विकत घेणारा पक्ष म्हणून बदनाम झाला आहे. भ्रष्टाचाऱ्यांना व्यापारी वृत्तीने पाठीशी घालणे हा एक ‘गुजरात पॅटर्न’ संपूर्ण देशभरात लागू होताना दिसत आहे, अशी टीका सामनातून केली आहे. त्यावर आता भाजप कशाप्रकारे उत्तर देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

दिल्लीत उद्या शाळा बंद राहणार, मुसळधार पावसामुळे सरकारने घेतला निर्णय

Spread the love