परीक्षा ( Exam) म्हंटल की चांगला वाईट निकाल लागणारच ! मात्र बऱ्याचदा कमी गुण मिळाले की विद्यार्थी नाराज होतात. अस्वस्थ होऊन चुकीचे पाऊल उचलतात. यामुळे आत्महत्येच्या घटना सुद्धा घडतात. नुकताच दिल्ली बोर्डाचा ( Delhi Board Result) निकाल लागला आहे. या निकालानंतर एका विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अमन विहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून याआधी देखील दोन विद्यार्थ्यांनी निकालाच्या नैराश्यातून आत्महत्या केली आहे.
आत्महत्या करणाऱ्या मुलीचा नुकताच बारावीचा निकाल लागला आहे. यामध्ये ती दोन विषयात नापास झाली आहे. दरम्यान सुसाईड नोट ( Suscide Note) लिहून पर्वा (ता.१२) या मुलीने आपले घर सोडले. त्यानंतर तिने नाल्यात उडी मारून आत्महत्या केली. १२ तारखेपासून या मुलीच्या कुटूंबियांनी ती गायब असल्याची तक्रार पोलीस स्टेशन मध्ये केली होती. मात्र, आज या मुलीचा मृतदेह नाल्यात अर्धा बुडालेला असल्याच्या स्थितीत सापडला.
शरद पवार यांच्या घरी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? जयंत पाटील म्हणाले…
आता हळूहळू सर्वच बोर्डांचे दहावी-बारावीचे निकाल जाहीर होत आहेत. यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांचा निकाल चांगला असेल असे नाही. अशावेळी पालकांनी आपल्या पाल्यासोबत संवाद साधून त्याला धीर द्यायला हवा. बऱ्याचदा पालक काय म्हणतील ? या तणावाखाली विद्यार्थी असे चुकीचे पाऊल उचलतात. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना समजून घेणे महत्त्वाचे आहे.