शेतकरी शेतात कष्ट करून पिकांचे भरगोस उत्पादन घेतात. परंतु कधी कधी निसर्ग त्यांना साथ देत नाही. अतिवृष्टी, दुष्काळ यासांरख्या संकटात पिकांचे नुकसान होते. यातून पीक वाचले तर बाजारात त्याला दर मिळेल का याची शास्वती नसते. सध्या महाराष्ट्रात कांद्याच्या (Onion in Maharashtra) बाबतीत असे झाले आहे. राज्यात कांद्याचा दर 35 ते 36 रुपयांवरून थेट 30 रुपयांवर गेला आहे.
दारूच्या नशेत चार मुलींनी मिळून एका मुलीला केली बेदम मारहाण; पाहा VIDEO
मुंबई कृषी उत्पन्न कांदा बटाटा बाजार समिती येथे मागच्या आठवड्यात कांद्याच्या दरात वाढ झाली होती. परंतु, आज सोमवारी बाजारात कांद्याच्या दारात ५ ते ६ रुपयांनी घसरण झाली असून कांदा प्रति किलो ३० रुपयांवर आलेला आहे. राज्यात मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्याने कांद्याचे दर कमी झाल्याचे सांगितले जात आहे.
शेतकऱ्यांची पिळवणूक करण्यावरून अजित पवार सरकारवर भडकले; म्हणाले, “राज्यसरकारने अजूनही…”
महाराष्ट्रात मध्यप्रदेश मधून येणाऱ्या कांद्याची आवक वाढली आहे. शिवाय इतर राज्यात सुद्धा मध्य प्रदेश मधील कांदा विकला जात आहे. यामुळे कांद्याच्या दरात (decreasing Onion rates) मोठया प्रमाणात घसरण होत असल्याचे दिसून येत आहे. एपीएमसी घाऊक बाजारात दोन आठवड्यापूर्वी कांद्याचे दर स्थिर होते. मात्र मागील आठवड्यात कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होऊन ५ ते १० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे बाजारातही कांदा ४० ते ४५ रुपयांवर गेला. यामुळे शेतकरी आनंदात होते. पण आता परत कांद्याचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
चक्क कुत्र्याने केला बिबट्याचा सामना; सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल