अरमान मलिक (Arman Malik) हा एक प्रसिद्ध युट्युबर (Youtuber) आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या दोन्ही पत्नी कृतिका मलिक व पायल मलिक एकाचवेळी गरोदर असल्याचे वृत्त आले होते. यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात देखील अडकला होता. अशातच अरमान मलिक बाबत नवीन माहिती समोर येत आहे.
मोठी बातमी! आदिल खानचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर; राखी ढसाढसा रडत म्हणाली…
अरमान मलिकने पहिल्या दोन पत्नी असताना आता तिसरे लग्न केल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. नुकताच त्याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर ( Social Media) पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो त्याच्या तिसऱ्या बायकोची ओळख पहिल्या दोन बायकांना करू देत आहे.
उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावी-बारावीच्या परीक्षेला बसता येणार नाही; बोर्डाने दिले आदेश
यामुळे अरमान मलिकने खरच तिसरे लग्न केले का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. दरम्यान या व्हिडीओमध्ये त्याच्या पहिल्या दोन्ही बायका चिडलेल्या दिसत आहेत. त्याच्या तिसऱ्या पत्नीला पायल व कृतिका रागात काहीतरी सूनावत असल्याच देखील यामध्ये पहायला मिळत आहे.
“हिंदी बोलता येत नसेल तर दुसऱ्याकडून अर्थसंकल्प सादर करावा” – बच्चू कडू
मात्र हा संपूर्ण व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येते की, आरमानने तिसरे लग्न नाही केले. तो पायल मलिक व कृतिका मलिक यांच्यासोबत प्रॅन्क करत असल्याचे पुढे यामध्ये पहायला मिळत आहे. अरमान मलिकला पहिली पत्नी पायल मलिककडून एक मूल देखील आहे. सध्या तो त्याच्या दोन्ही पत्नी व मुलांसोबत वेगवेगळे व्हिडीओ बनवत असतो.
अर्थसंकल्प जाहिर होताच अंबादास दानवेंनी उपस्थित केला प्रश्न; म्हणाले, “महागाई अन् बेरोजगारीचं काय?”