
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये काव्या यादव (Kavya yadav) ही प्रसिद्ध युट्यूबर आहे. ‘बिंदास काव्या’ (bindhas kavya) या नावाने ती सोशल मीडियावर लोकप्रिय होती. काव्याचे युट्यूबवर 4.5 मिलियन फॉलोअर्स आहेत तर इन्स्टाग्रामवरही तिचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. पण काव्या यादव अचानक बेपत्ता (missing) झाली होती. काव्या ही अवघी 16 वर्षांची आहे. दरम्यान घरातून बाहेर पडताना तिने आपला मोबाईलही घरी ठेवला होता. तसेच तिच्याकडे पैसेही नसल्याचं तिच्या पालकांचं (parents) म्हणणं होतं.
राज्यातील शेतकरी राजासाठी आणखी एक योजना, वर्षाअखेरीस मिळणार ‘एवढी’ रक्कम
बेपत्ता झाल्यानंतर काव्याच्या आई वडिलांनी तिचा बराच शोध घेतला. पण काव्याचा बराच शोध घेऊनही ती सापडत नसल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून पालकांनी तिला घरी परतण्याचं आवाहन केलं होतं. तसेच पोलीस ठाण्यात काव्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. यावर औरंगाबाद पोलिसांनी तिला लखनऊला जाणाऱ्या ट्रेनमधून ताब्यात घेतले आणि तिच्या पालकांना याबाबत माहिती दिली.
Nana Patole: गणपती संपले, आता शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार नाना पाटोलेंचा राज्य सरकारला सवाल
पोलीस, चाहते आणि सोशल मीडियाच्या माध्यामातून मदत केलेल्या सर्वांचे आभार मानले आहेत. काव्याचा शोध लागताच तिच्या आई- वडिलांनी युट्यूबवर लाइव्ह येत याची माहिती दिली. अभ्यास करण्यासाठी आई- वडील ओरडल्याने काव्या घर सोडून निघून गेली होती. ती लखनऊ ट्रेनने तिच्या मूळ गावी जात होती.पोलीसांनी शोध सुरू केला आणि काव्या त्यांना इटारसी येथे ट्रेनमध्ये सापडली.