
बॉलिवूडमध्ये हिट चित्रपट देणारा दिग्दर्शक अशी रोहित शेट्टी याची ओळख आहे. गोलमाल, सिंघम, सर्कस यांसारखे अनेक हिट चित्रपट त्याने आजपर्यंत तयार केले आहेत. त्याच्या बहुतेक चित्रपटांमध्ये तो आवर्जून मराठी कलाकारांना संधी देत असतो. आजकाल बॉलिवूड मधील दिग्दर्शक व कलाकार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. रोहित शेट्टीचा ( Rohit Shetti) देखील पहिला मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (First Marathi Movie)
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! ठाकरे गटातील उपजिल्हाप्रमुखाचा शिंदे गटात अनेक कार्यकर्त्यांसह प्रवेश
‘स्कुल कॉलेज आणि लाईफ’ असे या चित्रपटाचे नाव आहे. ( School College & Life) यामध्ये तेजस्वी प्रकाश व करण परब प्रमुख भूमिकेत आहेत. गेले काही दिवस या चित्रपटाची टीम चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. यानिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये रोहित शेट्टीने चक्क मराठमोळ्या जेवणाचे कौतुक केले आहे.
“काहीही झालं तरी राजकीय भूकंप होणारच” अंबादास दानवे यांचे वक्तव्य चर्चेत
या मुलाखतीदरम्यान रोहित शेट्टीला तुझा आवडता महाराष्ट्रीयन पदार्थ कोणता? असे विचारण्यात आले. यावेळी रोहितने “मला झुणका-भाकरी आणि ठेचा खूप आवडतो.” असे सांगितले. रोहितचे हे उत्तर ऐकून सर्व चाहते आनंदी झाले आहेत. रोहितने आपल्या कामातून व बोलण्यातून नेहमीच मराठी संस्कृतीबाबत असलेला आदर दाखवला आहे.
पुणे विद्यापीठातील रॅपसाँग प्रकरणी अजित पवार यांनी व्यक्त केला संताप; म्हणाले…