खूप कमी वेळात स्वतःच्या मेहनतीने यश मिळवलेली अभिनेत्री म्हणून आलिया भट्ट ला ओळखले जाते. एकाच वर्षात गंगुबाई, डार्लिंग्स, डिअर जिंदगी, ब्रम्हास्त्र यांसारखे चित्रपट करून आलियाने स्वतःला सिद्ध केले आहे. आलिया भट्ट व रणबीर कपूर ( Aaliya Bhatt & Ranbeer Kapoor) यांच्या लग्नापासून हे दोघेही कायम चर्चेत असतात. त्यांच्या लग्नाचे, आलियाच्या डोहाळ जेवणाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. नुकताच आलियाने एका गोड मुलीला जन्म दिला आहे. या मुलीचे नाव त्यांनी ‘राहा’ असे ठेवले आहे.
उदयनराजे भोसले नाराज?, प्रतापगडावरील कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत
या मुलीच्या जन्मानंतर आलिया फारशी बाहेर कुठे दिसली नाही. सोशल मीडियावर मात्र ती कायम अपडेटेड असते. पण तुम्हाला वाचून आनंद होईल की काल आलिया ‘राहा’ (Raha) च्या जन्मानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी आली होती. आलियाच्या बहिणीचा वाढदिवस काल झाला. यावेळी तिने आपल्या बहिणीला सोशल मीडियावर फोटो टाकत शुभेच्छा देखील दिल्या होत्या. काल संध्याकाळी आलिया तिच्या बहिणीच्या वाढदिवसासाठी जुहू येथे आली होती.
हिम्मत असेल तर उद्धव ठाकरेंनी माझ्याविरोधात निवडणूक लढवावी; ‘या’ नेत्याचं खुलं आवाहन
यावेळी तिने काहीच मेकअप न करता अगदी साधे व सुटसुटीत कपडे घातले होते. कानात सोनेरी रंगाचे कानातले देखील होते. यावेळचा आलियाचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय. मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी आलेल्या आलियाला पाहून चाहते खुश झाले आहेत. या व्हिडिओला लोकांनी पसंती दिली असून वेगवेगळ्या कमेंट देखील केल्या आहेत.
एखाद्या महिलेकडे टक लावून पाहताय तर सावधान; 14 सेकंदापेक्षा जास्त वेळ झाल्यास होऊ शकते शिक्षा