Salman Khan । बॉलिवूडचा भाईजान (Bollywood Bhaijaan) अर्थात सलमान खान हा सतत त्याच्या सिनेमांसह (Salman Khan Cinema) वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत येत असतो. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्याने बॉलिवूडमध्ये (Bollywood) स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. ज्यावेळी त्याने अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकलं त्यावेळी त्याला खूप अडचणींना तोंड द्यावे लागले होते. सध्या त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामुळे चाहत्यांना त्याची चिंता वाटू लागली आहे. (Salman Khan Viral Video)
Nanded Hospital । नांदेडच्या मृत्यूतांडवांनंतर रुग्णांच्या नातेवाईकांनी केले गंभीर आरोप
सलमान खान एका श्रीमंत उद्योगपतीच्या नातवाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात गेला होता. त्यावेळी त्याने डान्सही केला. सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) चांगलाच व्हायरल होत आहे. त्यावरून चर्चांना उधाण आले आहे. कारण या व्हिडिओमध्ये त्याची तब्येत ठीक नाही, असे दिसत आहे. तरीही तो डान्स करत आहे. सिल्वर कलरचे जॅकेट आणि ब्लॅक पँट अशा लूक सलमानने केला होता.
Banana Crop Insurance । केळी विमा प्रश्न तापला; आंदोलन होणार…
पहा व्हिडिओ
Lastest video of Salman khan dancing in a wedding function in New Delhi last night.
— Syed Irfan Ahmad (@Iam_SyedIrfan) October 1, 2023
He looks so tired and unhealthy. He should take care of his health. pic.twitter.com/Tf2HycDweQ
दरम्यान, सलमान खानच्या या व्हायरल व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका युझरनं अशी कमेंट केली, ‘सलमान थकल्यासारखा दिसत आहे, तब्येतीकडे लक्ष दिले पाहिजे’ तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, तो थकलेले आणि अनफिट दिसत आहे किंवा तो त्याच्या वयामुळे तसा दिसत आहे. लवकरच त्याचा ‘टायगर ३’ (Tiger 3) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल.