Mahindra Thar । भारतीय बाजारात महिंद्रा (Mahindra) आपल्या अनेक कार लाँच करत असते. कंपनीच्या कारला मोठ्या प्रमाणात मागणीदेखील असते. त्यामुळे कंपनी आपल्या ग्राहकांचा विचार करून सतत नवनवीन फीचर्स कारमध्ये उपलब्ध करून देत असते. काही दिवसांपूर्वी कंपनीने आपली महिंद्रा थार लाँच (Mahindra Thar Launch in India) केली होती. लाँच केल्यापासून या कारला बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. (Latest Marathi News)
Khalapur Landslide । 72 तासांपासून शोधमोहीम सुरु! 27 जणांचा मृत्यू, तरीही 78 लोक गायबच
यामध्ये कंपनीने जबरदस्त फीचर्स मायलेज दिले आहे. त्यामुळे प्रत्येकाला ही कार खरेदी करावी असे वाटत असते. परंतु या कारची किंमत जास्त असल्याने प्रत्येकालाच ही कार खरेदी करता येत नाही. परंतु, जर तुम्हाला ही कार स्वस्तात खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. तुम्ही आता अवघ्या 25000 रुपयांत ही कार (Mahindra Thar Price) खरेदी करू शकता. कुठे मिळत आहे अशी शानदार ऑफर घ्या.
Vidarbha Rain । विदर्भात पावसाचा तांडव! हवामान विभागाने दिला सतर्कतेचा इशारा
सध्या कंपनी थारच्या 5 डोअर (Mahindra Thar 5 Door) व्हर्जनवर काम करत असून बाजारात या एसयूव्हीची सुरुवातीची किंमत (Mahindra Thar 5 Door Price) 10.55 लाख रुपये ते 16.77 लाख रुपये एक्स-शोरूम आहे. परंतु तुम्ही ही कार अवघ्या 1,33,000 लाख रुपये देऊन खरेदी करू शकता. हे लक्षात ठेवा की कर्ज स्वरूपात, तुम्हाला पाच वर्षांसाठी 9.8 टक्के व्याजदराने प्रत्येक महिन्याला 25,261 रुपये हप्ता भरावा लागणार आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे डाउन पेमेंट आणि कर्ज योजनेचा कालावधी बदलून तुम्हाला मासिक हप्ता बदलणे शक्य आहे. जर तुम्हाला या कर्ज योजनेची जास्त माहिती हवी असेल तर त्यासाठी तुमच्या जवळच्या महिंद्रा डीलरशिपला भेट द्यावी लागेल.
Urfi Javed । उर्फी जावेदचा नवीन लूक पाहून चाहते वैतागले, म्हणाले; ‘तू इतकी वाईट..’